शिक्षणक्रांती हे केवळ एक मासिक नसून विज्ञाननिष्ठ सामाजिक चळवळ आहे. या चळवळीचा जन्म एका वैज्ञानिक संन्यासी व्यक्तीच्या सूक्ष्मशक्तीच्या प्रेरणेतून आणि संकल्पातून झाला आहे. १९९३ मध्ये न्यू वे तत्त्वज्ञानचे प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद यांनी भास्कर जोशी यांना एक भावी पिढीच्या कल्याणासाठी एक संकल्प करावयास सांगितला होता. या संकल्पाप्रमाणे भास्कर जोशींनी ७ वर्षात ५,७६,५८६ विद्यार्थ्यांपर्यंत न्यू वे तत्वज्ञान नेणे अपेक्षित होते. भास्कर जोशींनी हा संकल्प वेळेआधी पूर्ण केला आणि हे करतानाच शिक्षणक्रांती मिशनचा जन्म झाला.